![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । प्रतिनिधी अजय विघे | कोपरगाव – भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर धडकल्याची घटना समृद्धी महामार्गावरील कोकमठाण शिवारात घडली आहे. कठडा तुटला असला, तरी सुदैवाने कार पुलावरून खाली पडली नाही. त्यामुळे चालकाचे प्राण वाचले आहेत.
बाळासाहेब धरम असे कारचालकाचे नाव आहे.
बाळासाहेब धरम हे कारमधून संभाजीनगरहून शिर्डीकडे येत होते. भरधाव कारवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्याला धडकली. या अपघातात संरक्षण कठड्याचा मोठा
भाग तुटला; परंतु सुदैवाने कार कठड्याला अडकून राहिल्यामुळे चालक बचावला आहे. महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून कारचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कार बाजूला काढण्यात आली आहे.