महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी । आयआरसीटीसी देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची जबरदस्त संधी देते. यावेळी IRCTC ने तुमच्यासाठी स्वस्त हवाई टूर पॅकेज आणले आहे. SINGAPORE-MALAYSIA EX PATNA असे या पॅकेजचे नाव आहे. IRCTC: आता स्वस्तात करुन या नेपाळची सैर, पशुपतीनाथ यांच्या दर्शनाची मिळेल संधी!या पॅकेजद्वारे तुम्ही आशियातील दोन सुंदर देशांची सैर करू शकता. आम्ही तुम्हाला IRCTC च्या सिंगापूर आणि मलेशिया टूरची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. फक्त 6 हजारात फिरुन या उदयपूर, IRCTC चं हे टूर पॅकेज आहे बेस्ट सिंगापूर-मलेशिया दौऱ्याची सुरुवात बिहारची राजधानी पाटणा येथून होणार आहे. सर्व प्रथम, प्रवासी पाटणा येथून विमानाने कोलकाता गाठतील. यानंतर, तुम्हाला कोलकाता येथून विमानाने मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे नेले जाईल. त्यानंतर तिथून तुमचा प्रवास सुरू होईल.
IRCTC चे हे टूर पॅकेज 8 दिवस आणि 7 रात्रीसाठी आहे. या टूरमध्ये तुम्हाला सिंगापूर आणि मलेशियातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी दिली जातेय. या टूरची सुरुवात 23 मार्च 2023 रोजी सुरू होईल आणि 29 मार्च 2023 रोजी तुम्ही परत याल.या टूरमध्ये तुम्हाला थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली जातेय. तसेच, फ्लाइटचे भाडे यात समाविष्ट आहे. या प्रवासात तुम्हाला स्विमिंग, बीच स्पोर्ट्स, बाइकिंग, कयाकिंग, पिकनिक अशा अनेक अॅक्टिव्हिटी करण्याची संधी मिळेल. हॉटेलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 2 आणि 3 शेअर रूमचा पर्याय मिळेल.
सिंगापूर आणि मलेशियामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आलिशान हॉटेलमध्ये दररोज नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय मिळेल. रात्री नाईट सफारीला जाण्याची संधी मिळेल. तसेच, तुम्ही केबल कार, बटू लेणीसह जेंटिंग डे ट्रिपचा आनंद घेऊ शकता.
सिंगापूर आणि मलेशियामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी जाण्यासाठी कॅबची सुविधा दिली जाईल. या टूरसाठी तुम्हाला मार्गदर्शक मिळेल. प्रवासादरम्यान ट्रॅव्हल विमा काढला जाईल.
या संपूर्ण टूर पॅकेजसाठी तुम्हाला किमान 1,09,358 रुपये खर्च करावे लागतील. हे शुल्क 2 आणि 3 लोकांसाठी प्रति व्यक्तीच्या हिशोबाने भरावे लागेल. तर एकट्या व्यक्तीला 1,27,575 रुपये खर्च करावे लागतील. या प्रवासासाठी डबल व्हॅक्सिनेट असणे बंधनकारक आहे. तुमच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी किमान 6 महिने असली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.