Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया 22 की 23 एप्रिल कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. यंदाची अक्षय तृतीया कधी आहे, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मातेला समर्पित केला आहे. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार हिंदू धर्मात उदय तिथीला कुठलाही दिवस हा साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया 22 की 23 एप्रिल कधी आहे? (When is Akshaya Tritiya 22 or 23 april 2023) जाणून घेऊयात.

अक्षय्य तृतीया कधी आहे? (Akshaya Tritiya 2023 Date)
प्रदोष आणि उदय तिथी आली की नक्की कधी सण साजरा करायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. अशावेळी ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात की, उदय तिथीनुसार सण साजरे केले पाहिजे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीया ही शनिवारी 22 एप्रिल 2023 ला साजरी केली जाणार आहे. तर काही ठिकाणी महिला 23 एप्रिल 2023 ला उपवास करणार आहेत.

अक्षय्य तृतीया 2023 तिथी (Akshaya Tritiya 2023 Tithi)
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही 22 एप्रिल 2023 सकाळी 07.49 वाजता सुरु होणार आहे. तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 23 एप्रिल 2023 ला सकाळी 07.47 वाजेपर्यंत संपणार आहे. त्यामुळे 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया हा शुभ संयोग होत आहे. या शुभ संयोगाचा लाभ सर्वांनाच होणार आहे.

अक्षय्य तृतीया 2023 पूजा मुहूर्त (Akshaya Tritiya 2023 Puja Muhurat)
अक्षय्य तृतीया पूजेचं शुभ मुहूर्त 22 एप्रिल 2023 ला सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे. अक्षय्य तृतीयेला स्नानाचं विशेष महत्त्व आहे. अशा स्थितीत 23 एप्रिलला ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होईल, ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात. यादिवशी दान, जप, हवन, तर्पण इत्यादी गोष्टी केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते.

अक्षय्य तृतीया 2023 खरेदीचा मुहूर्त (Akshaya Tritiya 2023 Shopping Muhurat)
अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी सगळ्यात शुभ दिवस आहे. त्यामुळे यादिवशी सोने आणि चांदी खरेदीसोबतच घर आणि गाडी खरेदी करतात. या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास माता लक्ष्मीची कृपा होते.

सोने खरेदी शुभ मुहूर्त – 22 एप्रिल 2023 ला सकाळी 07.49 वाजेपासून 23 एप्रिल 2023 ला सकाळी 07.47 वाजेपर्यंत

अक्षय्य तृतीया 2023 पंचांग मुहूर्त (Akshaya Tritiya 2023 Panchang Muhurat)
सकाळचा मुहूर्त (शुभ) – 22 एप्रिल 2023 ला सकाळी 07:49 वाजेपासून 09:04 वाजेपर्यंत
दुपारचा मुहूर्त (चार, लाभ, अमृत) – 22 एप्रिल 2023 ला सकाळी 12:20 वाजेपासून संध्याकाळी 05:13 वाजेपर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ) – 22 एप्रिल 2023 ला संध्याकाळी 06:51 वाजेपासून रात्री 08:13 वाजेपर्यंत
रात्रीची वेळ (शुभ, अमृत, चार) – 22 एप्रिल 2023 ला रात्री 09:35 वाजेपासून रात्री 01:42 वाजेपर्यंत
उषाकाल मुहूर्त (लाभ) – 23 एप्रिल 2023 ला पहाटे 04:26 वाजेपासून पहाटे 05:48 वाजेपर्यंत


या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा.
त्यानंतर पिवळे कपडे परिधान करा.
मंदिरातील विष्णूजींना गंगाजलाने स्नान घाला.
तुळशीची पूजा करुन पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा.
तुळशीची उदबत्ती आणि दिवा लावून पूजा करा.
विष्णूजींच्या ग्रंथाचं पठण करुन आरती करा.
पूजेनंतर गरिबांना अन्नदान करा.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व (Akshaya Tritiya Significance)
धार्मिक ग्रंथानुसार यादिवशी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला गुरुमंत्र दिला होता. ”या दिवशी युधिष्ठिर जे काही सर्जनशील किंवा सांसारिक कामं करेल, त्यातून त्यांना पुण्य मिळेल.” तेव्हापासून हा दिवस स्वयंभू शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो.

या दिवसाचे दुसरं महत्त्व म्हणजे या दिवसापासून भगवान विष्णूचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे यादिवशी गीतेच्या 18 व्या अध्यायाचं पठण करणं अतिशय शुभ असतं.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *