हा मासा आरोग्यास हानिकारक ; बंदी असूनही विकला जातोय हा खतरनाक मासा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । मासे म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पण एक असा मासा जो इतका खतरनाक आहे की त्याच्या विक्रीला भारतात बंदी आहे. तरी हा मासा महाराष्ट्रासह काही राज्यात विकला जातो आहे.नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने या माशाला 2000 सालीच बॅन केलं होतं. पण मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील ब्रीडिंग फार्ममधून 3 टन मासे जप्त करण्यात आले आहेत.

हा मासा 3 ते 5 फूट लांब असतो. त्याचं वजन 3 ते 4 किलो व्हायला 2 ते 3 महिने लागताच. अस्वच्छ पाणी आणि दलदलीच्या ठिकाणी हा मासा आढळतो. हा मासा इतर माशांना खातो, त्यामुळे मत्स्य पालनावर परिणाम होतो. एका अभ्यासानुसार भारतातील मूळ माशांच्या प्रजातींच्या संख्या 70 टक्के कमी होण्याचं कारण हा मासा आहे. म्हणून भारतात या माशावर बंदी घालण्यात आली. हा मासा जलीय इकोसिस्टमवर नकारात्मक परिणाम करतो. मत्स्यपालन करणारे या माशांची संख्या वाढवण्यासाठी या माशाला सडलेलं मांस खायला घालतात. यामुळे पाणी दूषित होऊन त्याचा परिणाम इतर माशांवर होतो.

या माशाच्या देखरेखीसाठी फार मेहनत लागत नाही. अस्वच्छ पाण्यातही ते जिवंत राहण्यास सक्षम असतात. फास्ट ब्रीडिंग प्रजाती आहे, त्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढते. याचा फायदा होत असल्याने हे मासे बंदी असूनही पाळले जात आहेत.अस्वच्छ पाण्यात राहिल्याने, सडलेलं मांस खाल्ल्याने त्याच्या लेडचं प्रमाण खूप असतं, ज्यामुळे कॅन्सर हो शकतो. याशिवाय अनेक संक्रमणही होऊ शकतात. असा दावा संशोधकांनी केला आहे.हा मासा म्हणजे मांगुर मासा. थाई कॅटफिश म्हणूनही हा मासा ओळखला जातो. याला वैज्ञानिक भाषेत क्लेरिअस म्हणतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *