राजस्थानकरांची होणार गर्दीतून सुटका; पुणे-बिकानेर विशेष रेल्वे 30 पासून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मे । येत्या 30 मे पासून रेल्वेच्या उत्तर-पश्चिम विभागाकडून पुणे ते बिकानेर साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्यातून एकच रेल्वेगाडी असलेल्या आणि त्याच रेल्वेगाडीत दाटीवाटीमध्ये बसून, पुण्यातून राजस्थानसाठी प्रवास करणार्‍या राजस्थानकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांची गर्दीतून सुटका झाली आहे.

स्थायिक असलेल्या राजस्थान -करांची गाडी दररोज असावी अशी मागणी आहे. पुणे-बिकानेर (क्र. 20476) ही गाडी 30 तारखेपासून दर मंगळवारी पुण्यातून रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. तर बिकानेरला दुसर्‍या दिवशी रात्री म्हणजेच बुधवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

तसेच, बिकानेर-पुणे (20475) ही गाडी दर सोमवारी स.7 वाजून10 मिनिटांनी सुटेल, तर पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. दरम्यान, ही गाडी वसई रोड, पालनपूर, मारवाड जंक्शन, भगत की कोठी, जोधपूर, मेरठ रोड, बिकानेर या ठिकाणी थांबा घेईल. या गाडीला 20 डबे असणार आहेत.

राजस्थानचे खासदार करणार पुण्यातून उद्घाटन
पुणे-बिकानेर ही गाडी पुण्यातून सुरू होणार आहे. त्या दिवशी राजस्थानमधील पाली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रेमप्रकाश चौधरी पुण्यात उपस्थित राहून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *