Shiv Sena: ‘शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार! उद्धव ठाकरेंकडे पुन्हा शिवसेना जाणार’ ; या नेत्याचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुन । राजकीय सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने सुपष्ट निकाल दिला आहे. त्यानुसार शिंदे सेनेचे आमदार अपात्र ठरणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याचकडे शिवसेना आणि धनुष्यबाण जाणार असल्याचा दावा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. याची स्पष्ट जाणीव असल्याने विधानसभेचे अध्यक्ष अपत्रातेच्या निर्णय घेण्यासाठी चालढकल करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

‘चला या सर्वच्च न्यालायचा निकाल समजून घेऊ या..‘ या कार्यक्रमांर्गत जितेंद्र आव्हाड यांनी आज देशपांडे सभागृहात जाहीर कार्यक्रम घेऊन न्यायालयाने दिलेल्या निकालाची सोप्या भाषेत उकल केली.

न्यायालयाने विविध पाच याचिकेवर १४१ पानांमध्ये आपला निकाल दिला आहे. तो सुपष्ट असाच असून देशावर दीर्घकालीन परिणाम करणार आहे. राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निकाल देताना १४१ पानांची चौकट बांधून दिली आहे.

त्याबाहेर त्यांना पडताच येणार नाही. त्यामुळे आमदारांना त्यांना अपात्र ठरवावेच लागणार आहे. हे बघता सरकार पडणारच असल्याचे यावेळी आव्हाड यांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यांची अडचण

आव्हाड म्हणाले की, व्हीप बदलण्याचा अधिकार पक्ष प्रमुखांना असतो. ज्यावेळी शिंदे सेनेचे व्हीप बदलला तेव्हा त्यांचा पक्ष (तुकडा) अस्तित्वाच नव्हता. आमदार म्हणजे पक्ष होत नाही. आमदारांच्या संख्येवर पक्ष ठरत नाही.

पक्षाची घटना ज्याच्याकडे आहे त्यालाच व्हीपमध्ये बदल करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सभागृहाचे नेते आणि निवडणूक आयोग वेगवेगळ्या संस्था आहेत. एकमेकांचे निर्णय त्यांना लागू होत नाही.

या संदर्भात निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांना आमदारांची संख्या नव्हे तर संविधान आणि शेड्युल १०नुसार निर्णय घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *